मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक : कृषी खात्यातर्फे अनुदान जाहीर : शेतकऱयांना होणार लाभ
प्रतिनिधी /वाळपई
जमिनीतील पाण्याची आद्रता मोजण्याचे मशीन विकसित करण्यात आले असून येणाऱया काळात जमिनीतील आद्रता मोजण्यासाठी तसेच संबंधित उत्पादनाला पाणी देण्यासंदर्भात शेतकऱयांना मदत होणार आहे. सदर मशीन गोवा सरकारच्या शेतकी माध्यमातून उपलब्ध करण्यात आले असून त्याला 90 टक्के अनुदान जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱया काळात या मशीनच्या माध्यमातून शेतकऱयांना फायदा होणार आहे.
झाडांना किती प्रमाणात पाणी देण्यात यावे, या संदर्भात अनेक वेळा शेतकऱयांना माहिती नसते. बऱयाचवेळा जमिनीतील वरील भाग पूर्णपणे सुकलेला असतो तर त्याच्या खालील जमिनीमध्ये पाणी असते. मात्र या संदर्भात अंदाज शेतकऱयांना येत नाही. अनेकवेळा क्षमतेपेक्षा जास्त पाणी देण्यात येत असल्यामुळे त्याचे प्रतिकूल परिणाम झाडांच्या वाढीवर होऊ शकतात. याचा विचार करून सदर मशीन उपलब्ध करण्यात आलेली आहे.
या मशिनचे विक्रेते एस. पी. एंटरप्राइजेसचे मालक प्रसाद खाडिलकर यांनी सांगितले की, या मशीनच्या माध्यमातून शेतकऱयांना बऱयाच प्रमाणात फायदा होणार आहे. जमिनीतील आद्रता मोजण्यासाठी ते उपयुक्त असून एका क्षणामध्ये आपण जमीनीची आद्रता मोजू शकतो. मशीन अवघ्या 1900 रु. मध्ये उपलब्ध होणार असून यासाठी 90 टक्के अनुदान शेतकी खात्याने जाहीर केलेले आहे.
यासंदर्भात प्रात्यक्षिक अनेक ठिकाणी घेण्यात आलेली आहेत. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या बागयतीमध्ये सदर मशीनचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. मशीन उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱयांना पाणी देण्याचा अंदाज येणार असून त्याचा येणाऱया काळात चांगल्या प्रकारे फायदा शेतकऱयांना होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया प्रतापसिंह राणे यांनी दिली.
सदर मशीनच्या माध्यमातून अवघ्या एका क्षणामध्ये भूगर्भातील आद्रता तपासण्याची प्रक्रिया सुटसुटीत होणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो, असे शेतकरी अशोक जोशी यांनी सांगितले.
या मशीनच्या माध्यमातून विजेची मोठय़ा प्रमाणात बचत होणार असून शेतकऱयांना आर्थिक फायदा होणार आहे, असे उदय सावंत यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना स्पष्ट केले. सदर मशीन शेतकऱयांना कमीतकमी रकमेत उपलब्ध होणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वनाथ गावस यांनी केले आहे.