काकती पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
गौंडवाड येथे जमीनीच्या वादातून दोन गटामध्ये सोमवारी रात्री हाणामारी झाली. या प्रकरणी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मनीषा बसवंत कुट्रे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा नोंदविला आहे.
गौंडवाड येथील 1 एकर 22 गुंठे जागा कुळकायद्याने भरत पाटील आणि अशोक पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर ती गजानन पाटील यांनी जमीन इतरांना विक्री केली होती. त्यातून दोन गटामध्ये वाद झाले. फिर्यादीच्या घरावर तसेच बेकरीवर दगडफेक करुन वाहनांची मोडतोड करण्यात आली. यामुळे पाच जणांविरोधात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
शालू मल्लाप्पा पवार, विनायक बाबुराव पाटील, राजू संतु पाटील, उमेश तानाजी पाटील, जोतिबा भैरु पाटील (सर्व रा. गौंडवाड) यांच्यावर काकती पोलीस स्थाकात फिर्याद दाखल झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.