रस्त्याने घेतला मोकळा श्वास : पालिकेने परिसराची केली स्वच्छता
प्रतिनिधी/ सातारा
नवीन शिवाजी संग्रहालयात सुरू करण्यात आलेल्या जम्बो कोविंड हॉस्पिटल परिसरातील अतिक्रमण पालिकेने मंगळवारी काढली. रस्त्यालगतचा कचरा उचलण्यात आल्याने परिसर स्वच्छ झाला. यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असून बेडची संख्या अपुरी पडत आहे. म्हणून नवीन शिवाजी संग्रहालयात जम्बो कोंविड हॉस्पिटलची उभारणी करण्यात येत आहे. या हॉस्पिटलच्या परिसरात एसटी स्टॅड लगतच्या रस्त्यावर खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले होते. तसेच प्रवासी वाहनाने स्टॉप होते. मंगळवारी पालिकेच्या कर्मचाऱयांनी या अतिक्रमणावर हातोडा मारला. ही सर्व अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी खाद्य पदार्थाची विक्री बंद होती. यामुळे अतिक्रमण लवकर हटवण्यात आले. तसेच या रस्त्यालगत अनेक दिवसापासून वाहनधारक, विप्रेते कचरा टाकत होते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. हा कचराही हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला.