हुतात्मा स्मारकासमोरचा नंबर कधी?
प्रतिनिधी/सातारा
जम्बो हॉस्पिटल सुरू झाल्याने आता त्या परिसरात रस्त्यावर फूटपाथवर अतिक्रमण नको म्हणून पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने टपऱया काढल्या. मात्र, हुतात्मा स्मारकाच्या समोर असलेल्या टपऱया कधी हटवणार अशी चर्चा सुरू आहे. येथे करंजे येथील एका भाईने टपऱया टाकून भाडय़ाने दिल्या आहेत. त्या हटवायला पालिकेचे पथक धाडस करत नाही, अशी चर्चा सुरू आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी जम्बो हॉस्पिटल सुरू झाले आहे. त्या हॉस्पिटलच्या समोर रस्त्यावर फुटपाथवर काही टपऱया व हातगाडे होते. तसेच औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या बाहेरही टपऱया होत्या. त्या टपऱया पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने हटवले. मात्र, हुतात्मा स्मारकाच्या बाहेर असलेल्या टपऱया हटवल्या नाहीत. एक तर हा भाजी स्टॉल अनाधिकृत आणि त्यात त्यांनी नारळ विक्रेत्याला 10 हजार महिना भाडय़ाने जागा दिली आहे. त्या भाईच्या धाकाला भिऊन पालिका अतिक्रमण हटाव मोहिम राबवली जात नाही, अशी जोरदार चर्चा आहे.