ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मूच्या सांबा सेक्टरमधील बीओपी चक फकीरा भागात बीपी नंबर 64 जवळ बीएसएफच्या जवानांनी संशयास्पद हालचाली दिसणाऱ्या पाकिस्तानी घुसखोराला आज सकाळी कंठस्नान घातले.
सकाळी दहाच्या सुमारास बीपी नंबर 64 जवळ एका नागरिकांच्या संशयास्पद हालचाली बीएसएफच्या जवानांना आढळून आल्या. त्यांनी संबंधित व्यक्तीला शरण येण्यास सांगितले. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचाली सुरूच होत्या. त्यामुळे जवानांनी त्याला कंठस्नान घातले. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, तपास सुरू आहे.