ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मूच्या आरएस पुरा भागात लष्कराने एका पाकिस्तानी महिला घुसखोराला ठार केले आहे. त्यानंतर लष्कराने या भागात शोधमोहिम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडील भागातून महिला घुसखोर भारतीय हद्दीत प्रवेश करु पाहत होती. या भागात गस्त घालणाऱ्या जवानांना तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी तिला इशारा दिला. मात्र, तरीही या महिला घुसखोराने भारतीय हद्दीत प्रवेश केला. जवानांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला. पण ती पळून जाऊ लागली. यावेळी जवानांनी केलेल्या गोळीबारात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर लष्कराने या भागात शोध मोहिम सुरू केली आहे.
दरम्यान, काश्मीर खोऱ्यात काही दहशतवादी घुसखोरी करण्यात यशस्वी झाले आहेत. मात्र, आम्ही लवकरच त्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करू, असे काश्मीरचे डिजीपी दिलबाग सिंह यांनी म्हटले आहे.