ऑनलाईन टीम / जम्मू :
देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच जम्मू काश्मीर मध्ये गेल्या चोवीस तासात 357 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 10 हजार 513 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 62 आणि काश्मीर मधील 295 जणांचा समावेश आहे. सध्या एकूण 10513 रुग्णांपैकी 4355 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 753 आणि काश्मीरमधील 3602 जण आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 5979 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1473 रुग्ण जम्मूतील तर 4506 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 179 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 17 जण तर काश्मीरमधील 162 जणांनी आपला जीव गमावला आहे. आतापर्यंत 3 लाख 13 हजार 152 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 37 हजार 867 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 4 हजार 355 लोक हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात आहेत.