प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्राच्या बारामती तालुक्मयातील बारामती सायकल क्लबच्या सदस्यांनी जम्मू काश्मिर ते कन्याकुमारी अशी सायकलमोहीम सुरू केली आहे. क्लबचे सदस्य संजय वराडे, सुवर्णा दराडे, सारीका दराडे, राधिका दराडे, हनुमंत क्षेमी, अजित चव्हाण, राजेंद्र ठवरे, सोनाली ठवरे या सायकलींपटू जम्मु काश्मिर ते कन्याकुमारी हा तब्बल 4 हजार किलो मीटरचा सायकल प्रवास हाती घेतला आहे. बुधवारी ते साधारण 3 हजार किलो मीटरचा प्रवास करुन बेळगावात दाखल झाले. त्यांनी हा प्रवासाला 12 डिसेंबर रोजी जम्मू काश्मिर येथून सुरुवात केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा म्हणून हा प्रवास करीत आहे. याबरोबर मुलगी, वाचवा, मुलगी शिकवा हा सामाजिक संदेश देत त्याची सायकलवरुन जनजागृती सुरु आहे. या आठ सायकलींग पटूंमध्ये 4 सदस्य एकाच कुटुंबातील आहेत.
या सायकलींगपटूचा सायकल चालविण्याचा छंद असून त्यांनी यापूर्वी अष्टविनायक, तुळजापूर, पंढरपूर, शिर्डी, लोणावळा, मुंबई या ठिकाणांना सायकलवरुन भेट दिली आहे. आजच्या तरुणांनी सायकल चालविल्यास प्रदुषण बऱयाच अंशी कमी कसा येईल, युवकांनी फेसबुक आणि व्हॉटस्ऍपमधून बाहेर सायकलींग संदर्भात जनजागृतीसाठी पुढे यावे आणि किमान आठवडय़ातून सुट्टी दिवशी तरी सायकलचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले आहे. या आठ सायकलींगपटूमध्ये विशेष करुन चार महिलांचा सहभाग आहे.