ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने फैलावत आहे. मागील 24 तासात 975 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 17 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 75 हजार 070 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 568 आणि काश्मीर मधील 407 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 17 हजार 017 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 9942 आणि काश्मीरमधील 7075 जण आहेत.
- दिवसभरात 1355 रुग्णांना डिस्चार्ज
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 1355 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 56,872 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 1181 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 342 जण तर काश्मीरमधील 839 जणांनी आपला जीव गमावला आहे.