ऑनलाईन टीम / जम्मू :
देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच जम्मू काश्मीर मध्ये गेल्या चोवीस तासात 162 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर काश्मीरमध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पूर्ण प्रदेशात आता पर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये श्रीनगर मध्ये सर्वाधिक 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जम्मू आणि उधमपूर जिल्ह्यातील चार जण आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 37 आणि काश्मीर मधील 124 जणांचा समावेश आहे. आता पर्यंत एकूण संख्या 1922 वर पोहचली आहे. यामधील 1041 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात जम्मूतील 288 आणि काश्मीरमधील 753 जण आहेत.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरच्या विवध रुग्णालयात असलेले 21 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. 1492 मधील 751रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 146 तर काश्मीर मधील 603 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये जम्मूतील 5 आणि काश्मीर मधील 16 रुग्ण आहेत.