ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या चोवीस तासात 666 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 32 हजार 646 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 126 आणि काश्मीर मधील 540 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 7 हजार 198 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 1471 आणि काश्मीरमधील 5727 जण आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 24 हजार 832 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 5602 रुग्ण जम्मूतील तर 19230 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 617 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 47 जण तर काश्मीरमधील 570 जणांनी आपला जीव गमावला आहे.
आतापर्यंत 4 लाख 32 हजार 406 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 42 हजार 950 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 7 हजार 198 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.