ऑनलाईन टीम / जम्मू :
देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच जम्मू काश्मीर मध्ये गेल्या चोवीस तासात 42 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामधील 9 जण हे जम्मूतील आहेत, तर काश्मीर मधील 33 जण आहेत. त्यामुळे येथील एकूण रुग्ण संख्या 1492 वर पोहचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1492 मधील 751रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 146 तर काश्मीर मधील 603 रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, काल सापडलेल्या नवीन रुग्णांमध्ये जम्मू मध्ये 2, अनंतनाग मध्ये 2, कुळगाम मध्ये 1, बंदिपोरा मध्ये एक, श्रीनगरमध्ये 2, बारामुला मधील 3, शोपियां मधील 18, कुपवाड मध्ये 3, बडगाम 1, पुलवामा 2, सांबातील 4, राजोरी मध्ये 2 आणि पुच्छ मधील एकाचा समावेश आहे.
तर शुक्रवारी 36 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये सांबातील एक जण आणि काश्मीर मधील 35 जण आहेत. काश्मीर मध्ये आता पर्यंत 650 जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर जम्मू मध्ये रुग्ण बरे होण्याचा आकडा 70 वर पोहचला आहे.