ऑनलाईन टीम / जम्मू :
देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच जम्मू काश्मीर मध्ये गेल्या चोवीस तासात 387 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 9888 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 97 आणि काश्मीर मधील 290 जणांचा समावेश आहे. सध्या एकूण 9888 रुग्णांपैकी 3943 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 625 आणि काश्मीरमधील 3318 जण आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 5786 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1454 रुग्ण जम्मूतील तर 4332 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 159 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 15 जण तर काश्मीरमधील 144 जणांनी आपला जीव गमावला आहे.