ऑनलाईन टीम / जम्मू :
देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच जम्मू काश्मीरमध्ये गेल्या चोवीस तासात 473 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 23 हजार 927 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 128 आणि काश्मीरमधील 345 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 7 हजार 260 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 1856 आणि काश्मीरमधील 5404 जण आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 16 हजार 218 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 3511 रुग्ण जम्मूतील तर 12707 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 449 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 34 जण तर काश्मीरमधील 415 जणांनी आपला जीव गमावला आहे.
आतापर्यंत 3 लाख 84 हजार 044 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 42 हजार 616 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 7 हजार 260 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.