ऑनलाईन टीम / जम्मू :
देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच जम्मू काश्मीर मध्ये देखील गेल्या पंधरा दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी जम्मूमध्ये कोरोनाबाधितांची संख्या केवळ 58 होती ती वाढून आता वाढून 102 वर पोहचली आहे. गुरुवारी जम्मूमध्ये चार तर काश्मीर मध्ये 16 रुग्णांना कोरोनाची लागण झाली. या 20 रुग्णांना धरून आता जम्मू काश्मीर मधील कोरोना ग्रस्तांची संख्या 992 वर जाऊन पोहचली आहे. यामध्ये जम्मू मध्ये 102 तर काश्मीर मध्ये 890 जण आहेत.
दरम्यान, गुरुवारी नवीन सापडलेल्या रुग्णांमध्ये जम्मूतील रामबनमधून 3 आणि उधमपूरमधील एक जण आहे. तसेच श्रीनगरमध्ये 13, शोपियां मधील 2 आणि पुलवामामधील एकचा समावेश आहे. रामबन आणि उधमपूर मधील असे चारही जण बाहेरील राज्यातून आले होते त्यांना क्वारंनटाइन करण्यात आले आहे.