ऑनलाईन टीम / जम्मू काश्मीर :
जम्मू काश्मीरमध्ये आज पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. शनिवारी पहाटे 4.29 मिनिटांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम जवळ हा भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.