ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी जोरदार बर्फवृष्टी झाली. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पूंछ, रामबन, दोडा, किश्तवाड, अनंतनाग, बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच हिमस्खलनाचा इशारा दिला.
बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्गासह जवळपास 200 रस्ते बंद करण्यात आले आहेत. हजारो वाहने रस्त्यावर अडकली आहेत. अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सोमवारी सायंकाळपासून अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
बर्फवृष्टीच्या भागात रस्त्यांवरील बर्फ काढून टाकण्याच्या काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 12 तास काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी सुरू राहण्याची शक्यता आहे.