उरी भागात 3 दहशतवाद्यांना अटक ः शस्त्रास्त्र अन् दारुगोळाही हस्तगत
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी बारामुल्लाच्या उरी भागातून 3 दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रs अन् मोठय़ा प्रमाणात दारूगोळाही हस्तगत करण्यात आला आहे. हे दहशतवादी मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत होते. संबंधित परिसराला घेरून सुरक्षा दलांकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
यापूर्वी बुधवारी नौगावमध्ये सुरक्षा दलांनी एका चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा केला होता. मारले गेलेल्या दहशतवाद्याचे नाव उजैर अशरफ दार होते. त्यांच्याकडून पिस्तुल, मॅगजीन, ग्रेनेह हस्तगत करण्यात आले होते.
यापूर्वी 12 जून रोजी बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकाला लक्ष्य केले होते. सोपोरमध्ये दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन पोलीस हुतात्मा झाले होते आणि दोन नागरिकांना जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांचा हात होता.
मार्च महिन्यात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्तपथकावर गोळीबार केला होता. हा हल्ला श्रीनगरच्या लवेपोरा भागात झाला होता. या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले होते.