हीरानगर सेक्टरमध्ये 27 किलो हेरॉइन जप्त- तस्कराला कंठस्नान
वृत्तसंस्था/ कथुआ
जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. बीएसएफने येथे 27 किलो हेरॉइन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किमंत सुमारे 135 कोटी रुपये असल्याचे समजते. बीएसएफने एका तस्कराला कंठस्नान घातले आहे.
यापूर्वी रविवारी बारामुल्ला पोलिसांनी उरी भागात एका नार्को टेटर मॉडय़ूलचा पर्दाफाश केला होता. तेथून 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. या दहशतवाद्यांकडून 4 पिस्तुल, 10 ग्रेनेड, 21 लाख रुपये रोख, 4 वाहने आणि 9 किलो हेरॉईन हस्तगत करण्यात आले होते.
श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी म्हणजेच 22 जून रोजी सीआयडी इन्स्पेक्टरची हत्या केली होती. ही घटना नौगाम भागात घडली. कनिपोरा येथे दहशतवाद्यांनी इन्स्पेक्टर परवेज अहमद डार यांच्यावर त्यांच्याच घरानजीक गोळय़ा झाडल्या होत्या.