ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या डोडाजवळ आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल एवढी होती.
दरम्यान, शनिवारी पहाटे 5.11 वाजता लडाखमध्येही भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 एवढी होती.