ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमध्ये हद्दवाढीनंतर विधानसभेच्या 7 जागा वाढतील. विधानसभेत 83 जागांऐवजी 90 जागा मिळण्याची ही प्रक्रिया मार्च 2022 पर्यंत पूर्ण होईल. हद्दवाढ आयोगाच्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
जम्मू-काश्मीरच्या हद्दवाढ आयोगाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई आणि मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा म्हणाले, जम्मू-काश्मीरमधील विधानसभा मतदारसंघांची हद्दवाढ स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने केली जाईल. ही एक घटनात्मक प्रक्रिया आहे आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना कायद्यांतर्गत हद्दवाढ कायद्याने विहित केलेली प्रक्रिया आहे.
2011 च्या जनगणनेच्या आधारे ही हद्दवाढ होईल. हद्दवाढीचा मसुदा जनतेसमोर ठेवला जाईल. जनतेच्या सूचनांचा समावेश करून अंतिम मसुदा समोर येईल, असेही त्यांनी सांगितले.