ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने फैलावत आहे. मागील 24 तासात 1249 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 67 हजार 510 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 646 आणि काश्मीर मधील 603 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 19 हजार 918 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 11,544 आणि काश्मीरमधील 8,374 जण आहेत.
- 46,530 रुग्ण कोरोनामुक्त
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आज 2796 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 46,530 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 13,035 रुग्ण जम्मूतील तर 33,495 जण काश्मीरमधील आहेत.
- 1062 जणांचा मृत्यू
तर आतापर्यंत 1062 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 269 जण तर काश्मीरमधील 793 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात 14 हजार 891 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 19 हजार 918 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.