ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 232 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 03 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 18 हजार 495 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 129 आणि काश्मीर मधील 103 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 3 हजार 625 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 458 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,13,026 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 46,272 रुग्ण जम्मूतील तर 66,754 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1844 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 676 जण तर काश्मीरमधील 1168 जणांनी आपला जीव गमावला आहे.