ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी 10 वाजून 42 मिनिटांनी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल एवढी होती. जमिनीपासून पाच किलोमीटर खोलवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने यासंदर्भात माहिती दिली.
शनिवारी दुपारीही जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून 120 किलोमीटर खोलवर होता.
गुरुवारी सकाळी 8.19 वाजता गुलमर्ग येथे 3.7 तीव्रतेचा भूकंप झाला होता. दरम्यान, मंगळवारीही जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.