ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 487 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 08 हजार 306 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 232 आणि काश्मीर मधील 255 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 5 हजार 275 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 471 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,01, 363 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 40,717 रुग्ण जम्मूतील तर 60, 646 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1668 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 574 जण तर काश्मीरमधील 1094 जणांनी आपला जीव गमावला आहे.