ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 589 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 88 हजार 958 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 241 आणि काश्मीर मधील 348 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 8 हजार 124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 349 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 79,437 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 32,115 रुग्ण जम्मूतील तर 47,322 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1397 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 463 जण तर काश्मीरमधील 934 जणांनी आपला जीव गमावला आहे.