ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 696 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 81 हजार 793 वर पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 276 आणि काश्मीर मधील 420 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 11 हजार 482 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 5,282 आणि काश्मीरमधील 6,198 जण आहेत.
- 69,020 रुग्ण कोरोनामुक्त
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आज 1,336 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 69,020 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 27,092 रुग्ण जम्मूतील तर 41,928 जण काश्मीरमधील आहेत.
- 1291 जणांचा मृत्यू
तर आतापर्यंत 1291 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 409 जण तर काश्मीरमधील 882 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात 26 हजार 357 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 11 हजार 482 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.