एलईटीच्या दहशतवादी मॉडय़ुलचा पर्दाफाश ः सुरक्षा दलांची मोठी कारवाई
वृत्तसंस्था / जम्मू
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवादी मॉडय़ुलचा पर्दाफाश केला आहे. दहशतवादाचे हे नेटवर्क सीमेपलिकडून संचालित केले जात होते. याप्रकरणी पोलिसांनी 7 दहशतवाद्यांना अटक केली आहे. जम्मू विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
राजौरी येथून दोन मॉडय़ूलचा भांडाफोड करण्यात आला. याच्या अंतर्गत एलईटीचे 5 दहशतवादी जेरबंद करण्यात आले. तर जम्मू विभागातून एका मॉडय़ूलचा पर्दाफाश झाला असून तेथून 2 दहशतवादी जेरबद झाल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे.
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून 2 एके-47 रायफल, 6 पिस्तुल, 3 सायलेन्सर, 8 ग्रेनेड, 3 युबीजीएल, पिस्तुलच्या 6 मॅगजीन, एके रायफलच्या 6 मॅगजीन, 120 काडतूसांसह मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रs, दारूगोळा आणि स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत.
जम्मूमध्ये एलईटीचे हे मॉडय़ूल दोन वर्षांपासून सक्रीय होते. याचे संचालन फैसल मुनीर नावाचा दहशतवादी करत होता. मुनीरला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी बशीर डोडा हा पाकिस्तानातून निर्देश देत होता. हे मॉडय़ूल पाकिस्तानातून ड्रोनद्वारे पाडविण्यात येणारी शस्त्रास्त्रs अन् स्फोटके जमा करत होते. या कारवाईमुळे लष्कर-ए-तोयबाला जम्मू विभागात मोठा झटका बसल्याचे पोलिसांनी सांगितले