ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये गुरुवारी दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. लडाखच्या कारगिल भागात झालेल्या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टल स्केल एवढी होती. त्याचे केंद्र कारगिलच्या वायव्येस 119 किलोमीटर अंतरावर आहे.
तर जम्मू काश्मीर मधील भद्रवाह आणि किश्तवाडमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी अडीच वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी होती.
या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. यापूर्वी मंगळवारी देखील या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. ज्याची तीव्रता 4.0 रिश्टल स्केल एवढी होती.
भद्रवाह आणि किश्तवाडमध्ये जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. मागील 19 दिवसात या भागात आज सातव्यांदा भूकंप झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.