- 15 ऑगस्टनंतर दोन जिल्ह्यात होणार ट्रायल
ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या 4 जी इंटरनेट सेवे संदर्भात केंद्र सरकारने मंगळवारी सुप्रीम कोर्टाला सांगितले की, 4 जी इंटरनेट सेवेवर लावण्यात आलेले निर्बंध त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या काही भागांमध्ये ट्रायल घेऊन 15 ऑगस्टनंतर हटवले जातील.
न्यायमूर्ती एन. वी. रमण यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठासमोर केंद्राकडून अटॉर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले की, 15 ऑगस्ट नंतर जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्येकी एका जिल्ह्यात 4जी इंटरनेट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहे.
पुढे ते म्हणाले, समितीने निर्णय घेतला आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये 4जी इंटरनेट सेवा विस्तृत मूल्यांकनानंतर दिली जाणार आहे. आणि त्याच्या चाचणीच्या निकालांचा दोन महिन्यानंतर आढावा घेतला जाईल.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये मागील वर्षी ऑगस्टमध्ये हाय स्पीड इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती ज्यावेळी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा समाप्त करून राज्यांना दोन केंद्र शासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये विभाजन करण्याची घोषणा केली होती.