ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 364 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 92 हजार 225 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 147 आणि काश्मीर मधील 217 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 7 हजार 296 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिवसभरात 627 रुग्ण कोरोनामुक्त!
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 627 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 83,485 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 34,065 रुग्ण जम्मूतील तर 49,420 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1444 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 480 जण तर काश्मीरमधील 964 जणांनी आपला जीव गमावला आहे.