ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 1,718 नवे रुग्ण आढळून आले. तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 94 हजार 078 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 585 आणि काश्मीर मधील 1133 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 31 हजार 579 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 3,391 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 2 लाख 58 हजार 536 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 99,533 रुग्ण जम्मूतील तर 1,59,003 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 3963 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 1932 जण तर काश्मीरमधील 2031 जणांनी आपला जीव गमावला आहे.