ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू काश्मीरच्या डोडा भागात बुधवारी भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 2 वाजून 34 मिनिटांनी हा भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टल स्केल एवढी होती. डोडासह किश्तवाड आणि भद्रवाह मध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.