नवी दिल्ली
बनावट शस्त्र परवान्याप्रकरणी सीबीआयने जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि मध्यप्रदेशातील 14 ठिकाणीही मंगळवारी छापे टाकले आहेत. या कारवाईदरम्यान माजी आयएएस अधिकारी आणि जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालांचे सल्लागार राहिलेले बशीर अहमद खान यांच्या घरातची झडती घेण्यात आली आहे.
यापूर्वी सीबीआयने सुमारे 3 महिन्यांपूर्वी काश्मीरमध्ये शोधमोहीम चालवून 40 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले होते. यादरम्यान 2 वरिष्ठ आयएएस अधिकारी शाहिद इक्बाल चौधरी आणि नीरज कुमार यांच्या घरावरही छाप्याची कारवाई करण्यात आली होती. या दोन्ही अधिकाऱयांवर 2 लाख बनावट शस्त्र परवाने वितरित होण्याच्या प्रकरणात सामील असल्याचा आरोप आहे.
सरकारी आकडेवारीनुसार जम्मू-काश्मीर शस्त्र परवाना प्रदान करण्याप्रकरणी देशात अग्रस्थानी आहे. तेथे 2018-2020 या कालावधीत सर्वाधिक शस्त्र परवाने प्रदान करण्यात आले आहेत. या दोन वर्षांमध्ये देशभरात 22,805 शस्त्र परवाने देण्यात आले. यातील 18 हजार केवळ जम्मू-काश्मीरमध्ये प्रदान करण्यात आले आहेत. म्हणजेच देशातील 81 टक्के शस्त्र परवाने या केंद्रशासित प्रदेशात देण्यात आले आहेत.