- नैसर्गिक गुहेपासून 100 मीटर अंतरावर घडली घटना
ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमधील कटार येथील माता वैष्णो देवी मंदिराच्या आवारात भीषण आग लागली आहे. मंदिराजवळील कालिका भवनाजवळ काउंटर क्रमांक दोन जवळ ही आग लागली आहे. सध्या बचावकार्य सुरू असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी आग लागली आहे, तेथून नैसर्गिक गुहा सुमारे शंभर मीटर अंतरावर आहे. आगीच्या ज्वाळा भैरो घाटीपर्यंत दिसत आहेत. व्हीआयपी गेटजवळ शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची माहिती मिळत आहे. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.