ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील नयवाला खाद सीमाभागात ड्रोनच्या मदतीने टाकण्यात आलेली पाकिटे अखनूर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतली आहेत. जप्त केलेल्या पाकिटांमध्ये 2 एके-47 असॉल्ट रायफली, तीन एके मॅगझीन, एके 7.62 एम्युनियनचे 90 राउंड आणि एक स्टार पिस्तूलचा समावेश आहे.
पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या सीमाभागात घुसखोरी करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. सोमवारीही पाकिस्तानी लष्कराने पलनवाला सेक्टरमधील केरी, बटाल आणि बारडोह भागात लष्कर आणि निवासी भागांना लक्ष्य करून गोळीबार केला होता. पाकच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात दोन्ही देशांचे कोणत्याही प्रकारे नुकसान झाले नाही.
राजौरी जिल्ह्यातील सुंदरबानी सेक्टरच्या सीमाभागातही पाकिस्तानी लष्कराने सोमवारी सायंकाळी लष्करी चौक्यांना लक्ष्य करून गोळीबार केला होता.