ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 369 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 14 हजार 407 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 190 आणि काश्मीर मधील 179 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 5 हजार 016 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 342 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,07,624 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
यामध्ये 43,546 रुग्ण जम्मूतील तर 64, 078 जण काश्मीरमधील आहेत. तर आतापर्यंत 1767 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 631 जण तर काश्मीरमधील 1136 जणांनी आपला जीव गमावला आहे.