ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 581 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 97 हजार 805 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 228 आणि काश्मीर मधील 353 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 5 हजार 745 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- 90 हजार पेक्षाअधिक रुग्ण कोरोनामुक्त!
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 632 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 90,537 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 36,817 रुग्ण जम्मूतील तर 53,720 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1523 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 514 जण तर काश्मीरमधील 1009 जणांनी आपला जीव गमावला आहे.