ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान भारतीय सैन्यदलातील जवान कृष्ण वैद्य यांना वीरमरण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टर, बालाकोट सेक्टर आणि मनकोट सेक्टर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय सैन्य दलाकडून मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू आहे. भारतीय सैन्य दलाची एक तुकडी 23 जुलै पासून सर्च ऑपरेशन करीत आहे.
त्यातच भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी (24 जुलै 2021) सकाळीच चकमक सुरू झाली आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असून पोलीस आणि सैन्य दलाच्या संयुक्त टीमकडून दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. त्यातच भारतीय सैन्यदलातील जवान कृष्ण वैद्य हे शहीद झाले आहेत.
- शुक्रवारी सुरक्षा दलाने ड्रोन पाडला
शुक्रवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी जम्मू जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पाच किलोग्रॅम स्फोटक सामग्री (आयईडी) घेऊन जाणारे एक ड्रोन पाडले. यासोबतच दहशतवाद्यांचा हल्ल्याचा डाव हाणून पाडला आहे. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्रीच्या सुमारास आंतरराष्ट्रीय सीमेवर कानाचक येथे एक ड्रोन दिसून आला त्यानंतर सुरक्षा दलाने हा संशयास्पद ड्रोन पाडला.