ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या कनाचक भागात आयईडीने भरलेला पाकिस्तानी ड्रोन पाडून जम्मू पोलिसांनी घातपाताचा डाव उधळला. भारतीय सीमेच्या आत सहा किलोमीटर अंतरावर पोलिसांना हा ड्रोन आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार करून हा ड्रोन पाडला. ड्रोन पडल्यावर त्यामधील 5 किलो आयईडी जप्त करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून भारतीय सीमेवर संशयित ड्रोन आढळून येत आहेत. दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून घातपाताचा कट रचण्याच्या तयारीत असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी यापूर्वीच सूचित केले आहे. सुरक्षा दलांनीही या आव्हानाचा सामना करण्यासाठी रणनीती आखली आहे.