ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राजमार्गावर बनिहाल शहराजवळ स्फोट झाला. बनिहाल बायपासचे काम करणाऱ्या एमजी कंपनीचे कार्यालय आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ हा स्फोट झाला असून, दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याचे सांगण्यात येते. या स्फोटात एमजी कंपनीचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.
गोपाल शर्मा (35) आणि मोहम्मद आकिब (16) अशी जखमी झालेल्या दोन कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास बनिहाल बायपासचे काम करणाऱ्या एमजी कंपनीच्या साईटवर हा हल्ला झाला. या हल्ल्यात कंपनीचे दोन कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी ग्रेडेन हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात बनिहाल पोलीस अधिक तपास करत आहेत.