कणकवली:
सिंधुदुर्ग दौऱयावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे खारेपाटण, नांदगावसह कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल-ताशा, फटाक्यांची आतषबाजी करताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. पाटील यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. स्वागतानंतर पाटील हे ओरोसच्या दिशेने रवाना झाले.
स्वागतप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जि. प. माजी अध्यक्ष काका कुडाळकर, नगरसेवक अबिद नाईक, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, प्रांतिक सदस्य विनोद मर्गज, युवक सरचिटणीस देवेंद्र पिळणकर, युवक जिल्हा सदस्य जयेश परब, डॉ. अभिनंदन मालंडकर, सुधाकर कर्ले, तालुका उपाध्यक्ष मंगेश दळवी, बाळा पवार, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सावळाराम अणावकर, अल्पसंख्यांक सेलचे रज्जाक बटवाले, सुभाष सावंत, विलास गावकर, इम्रान शेख, दिलीप वर्णे, राजेश पाताडे, अनिस नाईक, विशाल ठाणेकर, सागर पवार, सतीश पाताडे, रंजिता पाताडे, स्नेहल पाताडे, सत्यवान कानडे, सचिन अडुळकर, सचिन सदडेकर, दीपेश सावंत, अमित केतकर, वासीम फकीर, मुश्ताक काझी, आसिफ बटवाले, मुजफ्फर बटवाले, रफिक जेठी, अब्दुल नावलेकर, आलिम बटवाले, शाहरुख बोबडे, मोसीम बटवाले, अब्दुल पाटणकर, अरमान बटवाले आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.