ऑनलाईन टीम / जयपूर :
जयपूरमधील चौम्प गावाजवळ जगातले तिसरे मोठे क्रिकेटचे मैदान तयार करण्यात येणार आहे. नुकतीच राजस्थान क्रिकेट असोसिएशनने यासंदर्भात घोषणा केली आहे.
चौम्प गावालगत अंदाजे 100 एकर जमिनीवर हे मैदान उभारण्यात येणार आहे. 75 हजार प्रेक्षकांना बसता येईल, एवढी या मैदानाची क्षमता असणार आहे. इनडोअर प्रॅक्टीस, कार पार्किंग यासह अनेक अत्याधुनिक सेवा या मैदानात दिल्या जाणार आहेत.
दोन टप्प्यात या मैदानाचे काम पूर्ण केले जाईल. पहिल्या टप्प्यात ४५ हजार प्रेक्षकांना बसता येईल, या पद्धधतीने बांधकाम करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता 75 हजारांपर्यंत वाढविण्यात येईल. या मैदानासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, 350 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.