तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता जयरामन यांच्या चेन्नईतील घराचे स्मारकात रूपांतर करण्यात आले असून त्याचे उद्घाटन 28 जानेवारीला करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या हस्ते गुरुवारी हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. जयललितांचा जन्मदिवस 24 फेब्रुवारी हा असून हा दिवस दरवषी साजरा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
जयललिता यांच्या निवासस्थानाचे नाव वेदनिलायम असे असून मद्रास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे सर्वसामान्यांना या निवासस्थानात प्रवेशबंदी आहे. ही स्थगिती जयललिता यांचे निकटचे नातेवाईक दीपक आणि दीपा यांनी मिळविली आहे. त्यांनी या निवासस्थानाचा ताबा मिळविला असून या निवासस्थानाचे रूपांतर जयललिता यांच्या स्मारकात करण्याचे पूर्वीच ठरविले होते. मात्र, राज्य सरकारने या निर्णयाविरोधात अपिल केले असून त्यावर निर्णय प्रलंबित आहे.
कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता हा उद्घाटनाचा कार्यक्रम साधेपणाने करण्यात आला. हे निवासस्थान सरकारने संपादित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला तामिळनाडू मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाचे मंत्रीही उपस्थित होते. स्मारकाच्या उद्घाटनानंतर जयललितांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचेही अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे.