प्रतिनिधी / कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराजांचाङ एकेरी उल्लेख करून ‘छत्रपती शिवरायांची’ बरोबरी नरेंद्र मोदी यांच्यासोबत करणाऱया लेखक जय भगवान गोयल यांचा शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संतप्त शिवसैनिक आणि शिवसेनेच्या रणरागिणींनी जय गोयल यांच्या पोस्टरला कोल्हापूरी चपलांचा प्रसाद देऊन जाहीर निषेध व्यक्त केला. या पुस्तकाच्या लेखकाने जाहीर माफी मागावी. ज्या पक्षाच्या कार्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्या पक्षाच्या अध्यक्षांनी जाहीर माफी मागावी आणि पुस्तकावर बंदी घालावी, अशी जोरदार मागणी शिवसैनिकांनी केली.
या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, महेश उत्तुरे, जयवंत हारुगले, दीपक चव्हाण, धनाजी दळवी, अश्विन शेळके, दादू शिंदे, सुनील खोत, दीपक गौड, अजित राडे, रमेश खाडे, किशोर घाटगे, रणजित जाधव, महिला आघाडी शहरप्रमुख मंगल साळोखे, पूजा कामते, गौरी माळतकर, मीनाताई पोतदार, मंगल कुलकर्णी, रुपाली कवाळे आदी ङशिवसेना पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक, अंगीकृत संघटना पदाधिकारीङ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
गोयल यांच्या विरोधात घोषणाबाजी
जय भवानी जय शिवाजी, जय गोयल कोण रे पायताण मारा दोन रे अशा घोषणा देत शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी चौक परिसर दणाणून सोडला. यापुढे महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान खपवून घेणार नाही, असा इशाराही दिला.