वृत्तसंस्था/ माँटेपिलेर
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या एटीपी टूरवरील माँटेपिलेर खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या ऍलेक्झांडर व्हेरेव्हने एकेरीची अंतिम फेरी गाठताना स्वीडनच्या येमेरचा पराभव केला.
जर्मनीच्या टॉप सीडेड व्हेरेव्हने उपांत्य फेरीच्या सामन्यात स्वीडनच्या येमेरचा 6-1, 6-3 असा पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली. व्हेरेव्हने हा सामना 53 मिनिटात जिंकताना सहा बिनतोड सर्व्हिसची नोंद केली.