वृत्तसंस्था/ टय़ुरिन (इटली)
2021 टेनिस हंगामातील एटीपी टूरवरील वर्ष अखेरीच्या पुरुषांच्या अंतिम स्पर्धेत जर्मनीच्या ऍलेक्झांडर व्हेरेवने रेड गटातून एकेरीची उपांत्य फेरी गाठताना हुरकेझचा पराभव केला.
गुरुवारी रेड गटातील झालेल्या सामन्यात व्हेरेवने हुरकेझवर 6-2, 6-4 अशा सेटसमध्ये पराभव केला. रेड गटातून रशियाच्या मेदवेदेवने राऊंड रॉबीन गटातील आपला सलग तिसरा विजय नोंदविला. त्याने इटलीच्या सिनेरचा 6-0, 6-7 (5-7), 7-6 (8-6) असा पराभव केला. गेल्या वर्षी या स्पर्धेचे जेतेपद रशियाच्या मेदवेदेवने पटकाविले होते.