वृत्तसंस्था/ नेपोका
रूमानियात झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या आंद्रेया पेटकोव्हिकने एकेरीचे जेतेपद मिळविताना इजिप्तच्या शेरीफचा पराभव केला.
जर्मनीच्या पेटकोव्हिकने रविवारी अंतिम सामन्यात इजिप्तच्या मेयर सेव्हिकचा 6-1, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. 33 वर्षीय पेटकोव्हिक सध्या महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत 91 व्या स्थानावर असून तिचे डब्ल्यूटीए टूरवरील हे सातवे विजेतेपद आहे.