ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘वॉन वेल्स’ या जर्मनीच्या प्रसिद्ध बूट कंपनीने आपला चीनमधील व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही कंपनी भारतात आपला व्यवसाय सुरू करणार आहे. यासाठी कंपनीने लॅस्टीक इंटस्ट्रीजसोबत करार केला आहे.
चीनमधील व्यवसाय बंद केल्यावर आग्र्यामध्ये ही कंपनी आपला नवा प्रकल्प सुरू करणार आहे. वॉन वेल्स ही जर्मनीची दर्जेदार फुटवेअर्स तयार करणारी कंपनी आहे. जगप्रसिद्ध असलेल्या या कंपनीच्या उत्पादनांची विक्री 80 देशांमध्ये होते. या कंपनीच्या फुटवेअर्सचा वापर केल्याने पाय, गुडघे आणि कमरेला आराम मिळतो असा या कंपनीचा दावा आहे.
कोरोना या महामारीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत. मागील 2 दिवसांपूर्वीच ‘लावा’ या मोबाईल कंपनीने चीनमधील आपला व्यवसाय भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. लावा पुढील पाच वर्षात भारतात 800 कोटींची गुंतवणूक करणार आहे.