सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान, वारसदार ठरणार
बर्लिन / वृत्तसंस्था
चारवेळा सलग देशाच्या सर्वोच्चपदी राहिल्यानंतर आता जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मर्केल यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. जर्मनीतील सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी एक दिवस, अर्थात शनिवारी त्यांनी पदत्याग करीत असल्याची घोषणा केली. युरोपातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जर्मनीची प्रसिद्धी आहे. आता निवडणुकीच्या परिणामांवर साऱया जगाचे लक्ष आहे.
मर्केल प्रथम 2005 मध्ये जर्मनीच्या चान्सेलर बनल्या. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी हे पद सांभाळले. सध्या त्या 67 वर्षांच्या आहेत. युरोपियन महासंघाच्या त्या तारणहार होत्या. त्यांची जर्मनीची अर्थव्यवस्था बळकट केली. आज ती जगात अमेरिका आणि चीननंतरची सर्वात मोठी म्हणून ओळखली जाते. याचे श्रेय प्रामुख्याने मर्केल यांच्या धोरणांना जाते. त्यांच्या निवृत्तीमुळे युरोप आणि जर्मनीत एक मोठी पोकळी निर्माण होत असून ती कशी भरुन काढली जाते येत्या काही दिवसांमध्ये समजणार आहे. सध्याची निवडणूक अतिशय चुरशीची होत असून कदाचित कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत न मिळण्याची शक्यता आहे.